धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी जत तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण

धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून अंमलबावणी करावी, राजे यशवंतराव होळकर घरकुल योजना व पु.अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेच्या लाभार्थ्यांना निधी त्वरित वितरण करावे.

    जत : धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून अंमलबावणी करावी, राजे यशवंतराव होळकर घरकुल योजना व पु.अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेच्या लाभार्थ्यांना निधी त्वरित वितरण करावे, घोषणा केलेल्या निधीची तरतूद करावी, समाज्याच्या प्रश्नावर आंदोलन केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावीत, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बिरू खर्जे कुटुंबीयांना 25 लाख तत्काळ मदत द्यावी या मागण्यासाठी जत तहसील कार्यालयासमोर अशोक गोरड यांनी सोमवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला दुसऱ्या दिवशी जत तालुका ओबीसी समाज बांधवांनी तसेच तुकाराम महाराज आणि धनगर समाजाच्या बांधवानी उपस्थित राहत पाठिंबा दिला.
    आंदोलनस्थळी अभ्यास समितीची होळी
    आंदोलनस्थळी दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी असताना राज्य शासनाने समावेशची समिती नेमून धनगर समाजाची दिशाभूल करून समाजाच्या जखमेवर मीठ चोळले असल्याने आंदोलनस्थळी समितीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी जत तालुका ओबीसी समाज्याच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. यावेळी युवा नेते विक्रम ढोणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पाटील, शंकर वगरे, मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब माळी, तुकाराम माळी ,सलीम गंवडी, रमेश माळी, दिनकर पतंगे, प्रवीण शेठ गडदे, अन्नप्पा कंदे, तयाप्पा वाघमोडे, पापा हुजरे, रमेश माळी, सागर शिनगारे, तेजस्विनी व्हनमाने, युवराज माने, योगेश एडके आदीनी आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला.