नांदेडमध्ये ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

हे सगळे मजूर मूळचे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण बिहार येथून उदरनिर्वाह करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आलेले होते.

    नांदेड : नांदेड मधून अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा ही घटना घडली. मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकची आयशक टेम्पोसा धडक बसली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सगळे मजूर मूळचे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्वजण बिहार येथून उदरनिर्वाह करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आलेले होते.