हिंगोलीत भीषण अपघात; 190 मेंढ्यांसह 5 जणांचा जागीच मृत्यू

सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. हा अतिशय अपघात भीषण होता.

    हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हिंगोलीत एक मोठा अपघात घडला आहे. कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण पाचजणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय दोन जण गंभीर जखमी आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने उभ्या असलेल्या फरशीने भरलेल्या मालमोटरीला समोरून जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (fatal accident in hingoli five people died on the spot along with one hundred ninty sheep)

    घटनास्थळी पोलिसांची धाव…

    दरम्यान, सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. कळमनुरीजवळ असलेल्या माळेगाव फाटा येथे मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. हा अतिशय अपघात भीषण होता. तसेच या अपघातात अजून काही लोकं गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. पोलिसांना स्थानिकांच्या मदतीने जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यावेळी पाच जणांचा डॉक्टारांनी मृत घोषित केलं. सध्या जखमी झालेल्या मेंढ्यांवर पशुवैद्यकीय रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येत आहेत.