पुणे- बेंगलोर महामार्गावर पाचवडजवळ भीषण अपघात; बहिण, भावासह भाचा जागीच ठार

पुणे- बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे चारचाकीने पाठीमागून उभ्या ट्रकला भीषण धडक दिली असून, यामध्ये बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाला आहे. 

  कराड : पुणे- बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे चारचाकीने पाठीमागून उभ्या ट्रकला भीषण धडक दिली असून, यामध्ये बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाला आहे.

  मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून भाऊ नितीन पोवार हे कोल्हापूर पोलिस कर्मचारी आहेत. नितीन बापूसाहेब पोवार (रा. कोल्हापूर राजवाडा), मनीषा आप्पासाहेब जाधव आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा . जरळी, ता. गडहिंग्लज, जि . कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.

  कराड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कोल्हापूरहून कराडच्या दिशेला जाणाऱ्या लेन वरती पाचवड फाटा येथील भाग्यलक्ष्मी हॉटेल समोर उभे असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून चार चाकी गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत चार चाकीचा चक्काचूर झाला असून, गाडीतील तिघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळतात कराड तालुका पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

  कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयकुमार उथळे, डी. पी. जैन पीआरपो आफिसर दस्तगीर आगा यांच्यासह वाहतूक पोलिसांनी वाहन हटवली.

  भाच्याला साेडण्यासाठी जाताना दुर्घटना

  अपघातात ट्रकला पाठीमागून कारची धडक बसली. कारमधून भाऊ, बहीण आणि भाचा हे तिघेही पुण्याकडे निघालेले होते. नितीन पवार आपल्या बहिण आणि भाच्याला सोडण्यासाठी जाताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.