औरंगाबाद-नगर महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

कार अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने चालली होती. त्यावेळी चालकाला कायगाव येथील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार दुभाजकावर आदळून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला धडकली. यात चौघे जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली.

    औरंगाबाद- औरंगाबाद-नगर महामार्गावर (Aurangabad- Nagar Highway) झालेल्या भीषण अपघातात (Accident) चौघांचा जागीच मृत्यू (Death) झाला. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास या महामार्गाजवळ कायगाव येथे कारचा अपघात झाला. मृतांपैकी चौघेही व्यावसायिक (Business Men) असल्याचे सांगण्यात येत आहे.

    कार अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने चालली होती. त्यावेळी चालकाला कायगाव येथील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार दुभाजकावर आदळून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला धडकली. यात चौघे जण गंभीर जखमी (Injured) झाले. त्यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली.

    पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रावसाहेब मोटे, सुधीर पाटील, रतन बेडवाल आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. हे चौघे मित्र असून ते प्लॉटिंगच्या व्यवसाय करत होते. तर ज्या कारला यांच्या कारची धडक बसली, त्यातले पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहे.