‘मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे’वर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, तर दोनजण जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात इर्टीगा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात आर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे.

    पुणे – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) मध्यरात्री भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात (Borghat) झालेला अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, हा अपघात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर झाला आहे.

    मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात इर्टीगा कारचा (Ertiga Car) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या (Navi Mumbai) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात आर्टीगा कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरच कारचा भीषण अपघात झाल्यामुळे काही काळासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

    अब्दुल रहमान खान (३२ वर्षे, घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी (रा.राजापूर), राहुल कुमार पांडे (वय-३० वर्षे, कामोठे) , आशुतोष नवनाथ गांडेकर (२३ वर्षे अंधेरी) अशी मृतांची नावे आहेत. तर, मच्छिंद्र आंबोरे (वय ३८ वर्ष चालक), अमीरउल्ला चौधरी, दीपक खैराल हे गंभीर जखमी आहेत.