Fatal accident on Pune-Mumbai highway; Talatha's life was saved in the accident

    वडगाव मावळ : आरएमसी मिक्सर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला. हा अपघात बुधवारी (दि.3) सकाळी 11:40 वा. शेलारवाडी फाटा पुणे-मुंबई महामार्गावर ता.मावळ हद्दीत घडला. सुदैवाने जीवितहानी नाही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    मिक्सरने अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात

    देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मावळ तालुक्यातील कान्हे येथील तलाठी रवी मोहरूत हे पुण्यावरून कान्हे येते त्यांच्या कारने येत असताना, आर एम सी मिक्सर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने तलाठी रवि मोहरूत यांची कार पाठीमागून जोरात धडकून भीषण अपघात झाला.

    सीटबेल्ट लावला असल्याने कारचालक सुखरूप

    कार चालक रवी मोहरत यांनी सीटबेल्ट लावला असल्याने ते सुखरूप राहिले. अपघात इतका भीषण होता; या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. देहूरोड पोलीस अशोक गोरखे त्यांची टीम घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक व्यवस्थित केली. दोन्ही वाहने देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये जमा केली आहेत. पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशन करत आहेत.