समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू; घटनास्थळी मदतकार्य सुरू

संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात प्राथमिक माहितीनुसार 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

    रविवार सकाळची सुरुवात एका सुन्न करणाऱ्या बातमीने होतेय. संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात प्राथमिक माहितीनुसार 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    वैजापूर जवळील समृध्दी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला ट्रव्हलर बस धडकल्याचे समोर आले आहे. यातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती कळली आहे. हे सगळे लोक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते.

    मृत्यू झालेल्यामध्ये चार महिन्याच्या बालकाचा देखील समावेश आहे. जखमी वर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमका अपघात कसा झाला, याची चौकशी सुरु आहे.

    ट्रॅव्हल्समध्ये एकूण 30 जण करत होते प्रवास

    समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.

    पंतप्रधान कार्यालयाचं ट्विट

    समद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला. या घटनेने मनाला अतिव दु:ख झालं. ज्यांनी आपल्या जवळची माणसं गमावली त्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रर्थना करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएम केअर फंडमधून 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजारांची मदत केली जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.