समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारच्या अपघातात 2 जण जखमी

मुंबईकडून नागपूरकडे जात असलेली (एमएच 20 ईई 7879) या क्रमांकाच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना 24 नोव्हेंबरच्या रात्री घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावर घडला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले.

    कारंजा : मुंबईकडून नागपूरकडे जात असलेली (एमएच 20 ईई 7879) या क्रमांकाच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना 24 नोव्हेंबरच्या रात्री घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावर घडला. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले.

    सुरेश यादव व शानवाज शहबाज अशी जखमींची नावे आहेत. मर्सिडीज गाडी क्रमांक (एमएच 20 ईई 7879) ही कार रात्रीच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरुन नागपूरकडे जात होती. दरम्यान कारंजा लोकेशन 187 जवळ या गाडीच्या चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे हा अपघात घडला.

    अपघाताची माहिती तत्काळ विठ्ठल देशमुख यांनी तात्काळ श्री. गुरु मंदिर रुग्णवाहिक रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तत्काळ लोकेशन समृद्धी महामार्ग 108 पायलट विधाता चव्हाण यांना माहिती दिली. पायलट विधाता चव्हाण व डॉ. बी. एस. राठोड यांनी घटनास्थळी रुग्णवाहिकासह धाव घेतली. मर्सिडीज कार मधल्या एअरबॅग उघडल्यामुळे चालक व मालकाला किरकोळ जखमी झाले आहेत.

    त्यांचे नावे सुरेश यादव व शानवाज शहबाज अशी आहेत. त्यावेळी कारंजा लोकेशन एचएसपी टीम पीएसआय मधुकर राठोड, पोलिस कॉन्स्टेबल एस. सी. नवलकर व फायर टीम वैभव जाधव, शुभम चव्हाण, आजेश राठोड, धम्मदीप सूर्यवंशी व एमएसएफ भूषण नवताळे, अवगण व गौरव यांची टीम घटनास्थळी मदतीसाठी प्रामुख्याने हजर होती.