दुचाकी घसरून भीषण अपघात, तरूणीचा मृत्यू; प्रियकर अटकेत

बॉयफ्रेंडचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात २५ डिसेंबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भैरोबानाला परिसरात घडला. याप्रकरणी बॉयफ्रेंडला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

    पुणे : बॉयफ्रेंडचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात २५ डिसेंबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भैरोबानाला परिसरात घडला. याप्रकरणी बॉयफ्रेंडला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. व्यंकटप्रसन्ना श्रीनिवास विपुरी (२२ रा. घोरपडी, मुंढवा, पुणे) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी विल्सन मार्रिश पिल्ले (२२ रा. महंमदवाडी, पुणे ) याला अटक केली आहे. या प्रकरणी सुषमा विपुरी ( १९, रा. मुंढवा, पुणे) हिने तक्रार दिली आहे.

    व्यंकटप्रसन्ना आणि विल्सन २५ डिसेंबरला नाताळनिमित्त रात्री साडेबाराच्या सुमारास भैरोबानाला परिसरातून दुचाकीने जात होते. या वेळी विल्सनने भरधाव दुचाकी चालवल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरून पाठीमागे बसलेली व्यंकटप्रसन्ना खाली पडली. यात तिला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.