In Pune, a married woman committed suicide by consuming 50 pills of thyroid disease after getting fed up with her husband's troubles.

नांदेडमध्ये गतिमंद मुलीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने नैराश्यातून पित्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. हदगाव तालुक्यातील आष्टी येथील ही दुर्दैवी घटना आहे. दिपक पुंजाराम खंदारे असे विषप्राशन करुन आत्महत्या केलेल्या पित्‍याचे नाव आहे(Father commits suicide due to lack of money for daughter's treatment).

    नांदेड : नांदेडमध्ये गतिमंद मुलीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने नैराश्यातून पित्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. हदगाव तालुक्यातील आष्टी येथील ही दुर्दैवी घटना आहे. दिपक पुंजाराम खंदारे असे विषप्राशन करुन आत्महत्या केलेल्या पित्‍याचे नाव आहे(Father commits suicide due to lack of money for daughter’s treatment).

    हदगाव येथील दीपक खंदारे यांना दोन मुली आहेत. एक मुलगी गतिमंद आहे. तर एका मुलीचे दोन महिन्‍यांपुर्वीच कर्ज काढून लग्न केले. गतिमंद मुलीवर अनेक वर्षापासून उपचार सुरू आहेत. त्याचा फारसा काही फरक पडत नसल्याने आणि जवळचे पैसे संपल्याने.

    आता उपचारासाठी कुठून पैसे आणायचे म्हणून दिपकने शेतात जाऊन विषप्राशन करुन आत्महत्या केली. कुटूंबातील कर्ता पुरुष गेल्याने पत्नी रेखा यांच्‍यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच गतिमंद मुलीवर उपचार कसे करावे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे रेखा यांनी मदतीची मागणी केली आहे.