jalgaon murder case

आज पहाटे कल्याण आरपीएफ स्कॉड कल्याण स्टेशनला ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांची बॅगांची तपासणी करीत असताना त्याचवेळी मंगला एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. या गाडीच्या एका बोगीत तपासणी करीत असताना एका तरुणाच्या बॅगेत पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस सापडली.

कल्याण: जळगावमध्ये एका हत्येच्या (Jalgaon) प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर हा तरुण जेलमधून सुटून बाहेर आला. धम्मप्रियची गोळया घालून हत्या करण्यात आली. बापासमोरच मुलाची हत्या करण्यात आली. मुलगा धम्मप्रियची हत्या (Murder) करणाऱ्या आरोपीला मारण्यासाठी बाप थेट जळगाव कोर्टात गेला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोहर सुरडकर हा पकडला गेला. याच दरम्यान मनोहरचा साथीदार सुरेश हिंदाते हा पसार झाला. कल्याणच्या आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी सुरेश हिंदाते याला पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमधून अटक (Arrest) केली आहे.

आज पहाटे कल्याण आरपीएफ स्कॉड कल्याण स्टेशनला ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांची बॅगांची तपासणी करीत असताना त्याचवेळी मंगला एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. या गाडीच्या एका बोगीत तपासणी करीत असताना एका तरुणाच्या बॅगेत पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस सापडली. स्कॉडचे प्रमुख अनिल उपाध्याय आणि अन्य आरपीएफ जवानांनी या तरुणाला पुढील प्रक्रियेसाठी कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले. जीआरपी पोलिसांनी तपास सुरु केला. तरुणाचे नाव सुरेश हिंदाते हा असून तो जळगावचा राहणार आहे. तो एका सराफाकडे काम करत असल्याची माहिती मिळाली. जळगाव कोर्टात खूनाचा बदला घेण्यासाठी आरोपीला मारण्याकरीता गेला असता त्याचा साथीदार मनोहर सुरडकर हा पकडला गेला. मात्र त्या ठिकाणाहून सुरेश पसार झाला. त्याने जळगाव स्थानकातून मंगला एक्स्प्रेस पकडली आणि कल्याण गाठले. त्याच वेळी तपासणी सुरु असल्याने तो कल्याण स्थानकात पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

दोन वर्षापूर्वी एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर हा जेलमध्ये गेला होता. जेलमधून तो सूटन बाहेर आला. ज्या तरुणाची धम्मप्रियने हत्या केली होती. त्याच्या साथीदाराने गोळ्या घालून धम्मप्रिय सुरडकर याची हत्या केली. धम्मप्रियचे वडिल मनोहर सुरडकर मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जळगाव कोर्टात गेले. त्यांच्यासोबत सुरेश हिंदाते हा तरुण सुद्धा होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोहर याला ताब्यात घेण्यात आले. सुरेश हिंदाते हा पसार झाला होता. मात्र तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे.