
गेल्या दोन दिवासपासून पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहेत. काही भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पहायला मिळत आहेत. त्यात मिनीकाश्मिरची पर्यटकांना भारावून सोडणारी महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी मात्र धोक्यात आली आहे.
पाचगणी : गेल्या दोन दिवासपासून पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहेत. काही भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पहायला मिळत आहेत. त्यात मिनीकाश्मिरची पर्यटकांना भारावून सोडणारी महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी मात्र धोक्यात आली आहे.
उशीराच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाची उशीरा लागवड झालेल्या स्ट्रॉबेरी पिक काही दिवसात बहरु लागतील, असे चित्र दिसत असताना या अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीवर आता रोग पडण्याची शक्यता दिसू लागली आहे. ढगाळ वातावरणामुळेव पुरेशी थंडी नसल्यामुळे स्ट्रॉबेरी पिकावर गंभीर परिणाम दिसून आले आहेत. बुरशी, काळा, अशी रोगराई स्टोबेरीच्या पिकावर व फळांवरवर दिसून आली आहे. वातावरणातील कमालीच्या बदलामुळे स्ट्रॉबेरीच्या पिकावर रोगराई वाढत आहे.
विशेषत: ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये थंडी मोठ्या प्रमाणात सुरू पडते. जेव्हा थंडी जास्त पडते, तेव्हा स्ट्रॉबेरीचे पीक बहारात येत असते. गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचे सावट याचा गंभीर परिणाम स्ट्रॉबेरीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी, भिलार, कासवंड, जावली व महाबळेश्वर तालुक्यातील काही महत्त्वाच्या गावांमध्ये जाणवू लागली आहे.
उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता
पिकावर आता लाल रंगाचे डाग दिसू लागले असून यामुळे येणाऱ्या स्ट्रॉबेरी फळावरही त्याचा परिणाम दिसणार आहे. त्यामुळे या होणाऱ्या नुकसानीमुळे सध्या महाबळेश्वरातील शेतकरी चिंतेत आहे. या झालेल्या नुकसानीची पहाणी करुन शासनाकडून भरपाई मिळावी, यासाठी मागणी होऊ लागली आहे. हाच पाऊस जर लांबला तर मात्र उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.