vidhan parishad

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारांवर भिस्त असून ते गेमचेंजर ठरणार आहेत. अपक्ष आमदारांना वळवून घेण्यासाठी आघाडी व भाजपाने शक्ती पणाला लावली आहे. असून सर्वच पक्षांना क्रॉस व्होटिंगची भीतीही आहे( Fear of 'cross voting' in Rajya Sabha elections).

    मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारांवर भिस्त असून ते गेमचेंजर ठरणार आहेत. अपक्ष आमदारांना वळवून घेण्यासाठी आघाडी व भाजपाने शक्ती पणाला लावली आहे. असून सर्वच पक्षांना क्रॉस व्होटिंगची भीतीही आहे( Fear of ‘cross voting’ in Rajya Sabha elections).

    मंगळवारी आघाडीच्या झालेल्या बैठकीत 12 अपक्ष आमदारांनी हजेरी लावली होती. भाजपाकडे 106 आमदार आहेत. याशिवाय त्यांना लहान पक्षांसह अपक्षांचाही पाठिंबा आहे. यात रासपचे राहुल कुल, जनसुराज्यचे विनय कोरे, रवि राणा, प्रकाश अवडे, राजेंद्र राऊत, रत्नाकर गुट्टे, महेश बालदीसह 113 आमदारांचा पाठिंबा आहे. जगताप आजारी असल्याने मतदानास गैरहजर असतीलत त्यामुळे भाजपाकडे 112 मते आहेत. दोन उमेदवारांना 84 मते दिल्यानंतरही भाजपाकडे 28 मते शिल्लक राहतात.

    महाडिक यांना जिंकण्यासाठी 14 आणि पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता असेल. दुसरीकडे, आघाडीकडे शिवसेनेचे 55, राष्ट्रवादी 53, काँग्रेसचे 44 आमदार आहेत. याशिवाय सपा, प्रहारचे प्रत्येकी दोन, स्वाभिमानी शेतकरी, माकपाच्या प्रत्येकी एक आमदारासह 12 अपक्षांचे पाठबळ आहे. ही संख्या 170 वर पोहोचते परंतु देशमुख, मलिकांना मताधिकार नाकारल्याने 168वर आली आहे.