बिबट्याच्या भीतीने थेट नदीत उडी, जीव वाचवण्यासाठी ६० किमी पोहली

'देव तारी त्याला कोण मारी' असाच काहीसा अनुभव हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या कोळंबा येथील बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी यांच्या बाबतीत संपूर्ण खान्देशकरांना आला आहे.

    जळगाव – चोपडा ते अमळनेर या ६० किलोमीटरचा प्रवास पाण्यातून केला आहे. म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’ असाच काहीसा अनुभव हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या कोळंबा येथील बिबट्याच्या भीतीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या तापी नदीत झोकून देणाऱ्या लताबाई दिलीप कोळी यांच्या बाबतीत संपूर्ण खान्देशकरांना आला आहे. लताबाई यांनी बिबट्यापासून बचाव करण्यासाठी त्या पाण्यात उडी घेऊन तब्बल अंमळनेरपर्यंत ६० किलोमीटरचा प्रवास पाण्यातून करत आपला जीव वाचवला आहे.

    जळगावच्या कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी या तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. चोपडा तालुका म्हटले की, पहाडी क्षेत्र आणि त्यातल्या त्यात हिंसक प्राण्यांचा वावर हा निश्चित असतो. अशातच लताबाई यांच्या नजरेस पडेल ते भयावह दृश्य, पहाते तर काय चक्क बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागलेला होता. अशातच बिबट्या आपलीही शिकार करेल,या भीतीने त्यांनी तेथुन नदीच्या दिशेने वाटचाल करत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली.

    पाण्यात उडी घेतल्याने लताबाई कोळी या पाण्याचा प्रवाहात वाहत अमळनेर तसेच पाडळसरे धरण ओलांडून थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर दुसऱ्या दिवशी नाविकाना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या जिवंत अवस्थेत आढळून आल्या. लताबाई यांनी आपबीती कथित केल्यानंतर नाविक बांधवांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी लागलीच लताबाई कोळी यांना उपचारासाठी मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र  व पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.