केट्स पॉइंटवर सेल्फी घेताना दरीत कोसळून महिला पर्यटक ठार

महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना दरीत कोसळून एका महिला पर्यटक ठार झाली. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती मिळाली. अकिंता सुनिल शिरसकर (वय-२३) असे तीचे नाव आहे. तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.

    पाचगणी : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना दरीत कोसळून एका महिला पर्यटक ठार झाली. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती मिळाली. अकिंता सुनिल शिरसकर (वय-२३) असे तीचे नाव आहे. तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.

    याबाबत माहिती अशी की, मृत अकिंता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला आली होती. तो दोघे दुचाकीवरुन आले होते. यावेळी केट्स पॅाईंट परिसरातील नीडल होल पॉईंट येथे मृत पर्यटक महिला सेल्फी घेत होती. यावेळी तोल जावून ती दरीत कोसळली. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याने तिचा मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर व सह्याद्री ट्रेकर्सची टीम घटनास्थळी पोहचली. यानंतर बचावकार्यास सुरुवात झाली. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळला.