खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करावा ; भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांचे प्रतिपादन

खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करून माती व पाणी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.

    बारामती: खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करून माती व पाणी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.

    स्मार्टकेम टेक्नॉलॉजी लिमिटेड,पुणे महाधन व सोनाली फर्टीलायझर्स, मानकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने
    ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, या या कार्यक्रमातप्रमूख पाहुणे म्हणून काळे बोलत होते. यावेळी वासुदेव काळे म्हणाले, खत कंपन्यानी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून माती व पाणी परीक्षणासाठी शेतकऱ्याला प्रशिक्षित करावे. अनेक वर्ष शेतकऱ्याला हक्काचे मार्केट मिळाले नाही. केंद्र सरकारने भाजपाच्या एस.एम.पी प्रमाणेच एफआरपी सुध्दा बंधनकारक केल्यामुळे साखर कारखान्यांचा व शेतकऱ्यांचा फायदा झाला. कृषी क्षेत्रातील विमा कंपन्या तसेच इतर कंपन्यांनी नेहमी शेतकरी हिताचा विचार करावा. कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी आधुनिक संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना सातत्याने देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनाच्या योजनांची माहिती कंपन्यांनी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करून याठिकाणी आयोजित केलेला ऊस पीक परिसंवाद हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हीताचा असल्याचे वासुदेव काळे यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी ऊस पिकावरती खत व्यवस्थापन याविषयी महाधन कंपनीचे सोनल मार्केटिंग मॅनेजर व ऊस तज्ञ बिपिन चोरगे यांनी यावेळी योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी खते कशी दद्यावीत, याबाबत मार्गदर्शन केले . तसेच महाधन क्राॅपटेक हे शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे योग्य संतुलित ऊस पीकाचा आहार आहे, याची सविस्तर माहिती यावेळी दिली.

    यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रक तानाजी थोरात यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस पीक परिसंवाद, नॅनो टेक्नॉलॉजी, शेतकरी मेळावे, शेतकरी प्रशिक्षण शिबीरे, माती व पाणी परीक्षण कार्यशाळा अशी आनेक शेतकरी हिताचे कार्यक्रम आपण राबवित असल्याचे असल्याचे सांगून ते म्हणाले, सोनाली फर्टीलायझर्सच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना खते, औषेधॆ व बि-बियाणे चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिली जातात.जयराज इरिगेशन सिस्टीमच्या माध्यमातून एकाच छताखाली शेतकऱ्याला सर्व साहित्य माफक दरामध्ये उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्हीही बचत होत असल्याचे सांगितले.
    यावेळी मंडल कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे यांनी शासनाच्या योजनांविषयी माहिती दिली. महाधन कंपनीच्या वतीने रविराज वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती कारखान्याचे माजी संचालक बापूराव यादव होते यावेळी विविध क्षेत्रांमध्ये विक्रमी उत्पन्न काढलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

    कार्यक्रमास विलास माने,विश्वासराव रुपनवर , रवींद्र यादव, पोपट चव्हाण,माणिकराव भोसले, हनुमंत थोरात,दिलीप थोरात, दिलीप पांढरे, सचिन भाग्यवंत, लालासाहेब सपकळ, अमरसिंह कदम, तानाजी जाधव, बापूराव पांढरे, विठ्ठल थोरात, अंकुश रणमोडे,शिवाजी रुपनवर,महेश चव्हाण, अॅड विजय पांढरे, व्हाईस लेफ्टनंट अवधूत पांढरे, पत्रकार रियाज सय्यद यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले, तर आभार योगेश थोरात यांनी मानले.