अलिबाग येथील PNP नाट्यगृहाला भीषण आग; वेल्डिंगचे काम सुरू असताना उडाली ठिणगी आणि घात झाला

अलिबाग येथील एचपी पेट्राेल पंपासमाेर (HP Petrol Pump) पीएनपी नाट्यगृह आहे. सायंकाळी आकाशामध्ये माेठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली हाेती. थाेड्या कालावधीनंतर पीएनपी नाट्यगृहाला आग लागल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणच्या मार्गावर माेठ्या प्रमाणात अफरातफरी झाली.

    आविष्कार देसाई, रायगड : अलिबाग (Alibag) येथील पीएनपी नाट्यगृहाला (PNP Natyagruha) आज आग (Fire) लागल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. आग प्रचंड भीषण (Fierce fire) असल्याने या आगीत नाट्यगृहाचे फार मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.परंतु वेल्डिंगचे काम (Welding Work) सुरु असताना त्यातून उडालेल्या ठिणगीतून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. तब्बल अडीज तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. आगीमध्ये कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.

    नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना कळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

    अलिबाग येथील एचपी पेट्राेल पंपासमाेर (HP Petrol Pump) पीएनपी नाट्यगृह आहे. सायंकाळी आकाशामध्ये माेठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली हाेती. थाेड्या कालावधीनंतर पीएनपी नाट्यगृहाला आग लागल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणच्या मार्गावर माेठ्या प्रमाणात अफरातफरी झाली.

     

    मुरुडकडे जाणारी वाहने थांबवण्यात आल्याने जंक्शन चाैकामध्ये पेण, अलिबाग अशा चारही बाजूकडे माेठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. वाहनांच्या गर्दीमधून तातडीने आरसीएफ कंपनी, अलिबाग नगर परिषदेचे अग्निशमन दल दाखल झाले. त्यांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र आग भीषण असल्याने आग आटाेक्यात येण्यास वेळ लागला.

    आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. परंतु नाट्यगृहामध्ये वेल्डिंगचे काम सुरु हाेते. त्यातून उडालेल्या ठिगणीने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर दाेन ते तीन कामगार तातडीने बाहेर पडल्याची माहिती आहे. या आगीत नाट्यगृहातील साऊंड सिस्टिम, छत आणि खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारासमाेरील छत आणि भिंतीचा काही भाग काेसळला. सुदैवाने आज नाट्यगृहात कोणतेही कार्यक्रम नसल्यामुळे जीवितहानी टळली. घटनास्थळी पाेलीस दाखल झाले हाेते.

    पहा व्हिडिओ :