Fighting with the police, Chukka snatched the money from the pockets of the police and fled

आरोपींनी पोलिसांसोबत हुज्जतबाजी केली व गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या वेळी राणी औलाद हुसेन हिने एका पोलीस कर्मचा-याच्या पॅन्टच्या खिशात हात घालून जुगारात जप्त केलेली रक्कम, तीन मोबाईल हिसकावून घेतले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत तर, त्यांनी पोलिसाची कॉलर पकडून ओढले.

    अकोला : राणी औलाद हुसेन सह सहा महिला व चार पुरुष जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली आणि लोटपाट केली. एका पोलिसांच्या खिशातील रक्कम हिसकावून पळ काढला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुरुवारी मध्यरात्रीनंतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

    पोलिसांना माहिती मिळाली की, ईराणी झोपडपट्टीमध्ये खुलेआम जुगार अड्डा सुरु आहे. त्या माहितीवरून पोलिसांचे एक पथक पंचांना घेऊन गुरुवारी साडेसहा वाजताच्या दरम्यान ईराणी झोपडपट्टीत गेले. तेथे त्यांना राणी औलाद हुसेन हिच्या घरासमोर मोकळ्या जागेत चार पुरूष व सहा महिला जुगार खेळताना दिसून आल्या. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून १६ हजार १२० रूपये मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर जेव्हा पोलीस आरोपींना घेऊन  ठाण्यात येण्यासाठी निघाले तेव्हा, आरोपींनी पोलिसांसोबत हुज्जतबाजी केली व गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

    या वेळी राणी औलाद हुसेन हिने एका पोलीस कर्मचा-याच्या पॅन्टच्या खिशात हात घालून जुगारात जप्त केलेली रक्कम, तीन मोबाईल हिसकावून घेतले. एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत तर, त्यांनी पोलिसाची कॉलर पकडून ओढले. त्यामध्ये पोलिसाच्या शर्टचे बटन तुटले, त्यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपी पळाले.

    याप्रकरणी राणी औलाद हुसेन (वय ४०), सादिक अली बबलु अली (वय २९, जाफर अली तहजीब अली (वय ३५), जावेद अली सरवर अली (वय ३४) गुलाम अली औलाद हुसैन (वय ३५), शहजादी कासम अली वय ३०, रब्बाब बबलु अली (वय २२), शहजादी आसीफ अली (वय ४०), झिबा बबलु ईनायत अली वय (५५), आसीया औलाद हुसैन (वय ३०) या जुगारींविरुद्ध पोलीस कर्मचारी संजय जानराव येलोने यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत.