मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा ; मावळ तालुका सकल मराठा समाजाची मागणी

मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य जाती-जातीमध्ये तेढ  निर्माण करत मराठा समाजाची बदनामी केल्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मावळ तहसीलदार विक्रम देशमुख वडगाव पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले.

    वडगाव मावळ : मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य जाती-जातीमध्ये तेढ  निर्माण करत मराठा समाजाची बदनामी केल्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मावळ तहसीलदार विक्रम देशमुख वडगाव पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील जन आंदोलन करत आहेत.मंत्री छगन भुजबळ वारंवार मराठा समाज व इतर समाजाच्या लोकांमध्ये जातीय वाद होतील, अशी बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जातीय दंगली होतील, अशी परिस्थिती निर्माण करीत आहेत. याबाबत मावळ तालुका मराठा समाजाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करत मराठ समाजाची बदनामी केल्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे