‘कुस्ती आखाडा, स्पोर्ट सेंटर’ला अंतिम मंजुरी; पूनम पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बेलापूर गावातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारी श्रीराम नवमीची यात्रा..! या यात्रेचा इतिहास तसा दोनशेहून अधिक वर्षे जुना आहे. मला माहिती असल्याप्रमाणे या यात्रेनिमित्त गेल्या २०० हुन अधिक वर्षांपासून, यात्रेनिमित्त कुस्त्यांचे खेळ भारतात आणि बेलापूर केसरी हा किताब पुरस्कार विजयी मल्ल्याला दिला जातो. परंतु, या कुस्ती खेळासाठी कायमस्वरूपी आखाडा मैदान तयार करण्यात आले नाही. ही बाब मला कुठे तरी खटकत होती.

    नवी मुंबई : बेलापूर-शहाबाज विभागाच्या स्थानिक मा. नगरसेविका पूनम मिथुन पाटील (Poonam Patil) यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार नवी मुंबई महापालिकेतर्फे (Navi Mumbai Municipal Corporation) बेलापूर (Belapur) गावात सुसज्ज कुस्ती आखाडा (Wrestling Arena) आणि आधुनिक स्पोर्ट सेंटरला (Sports Center) अंतिम प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून, सदर उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे, अशी माहिती पूनम पाटील यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    पूनम पाटील यांनी माहिती दिली की, नवी मुंबई महापालिकेची स्थापना १९९२ पासून ते २०१५ पर्यंत म्हणजे मी नगरसेविका होईपर्यंत, आमच्या बेलापूर गावातील एका महत्वाच्या प्रश्नाकडे तत्कालीन सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. आणि तो प्रश्न म्हणजे आमच्या बेलापूर गावातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारी श्रीराम नवमीची यात्रा..! या यात्रेचा इतिहास तसा दोनशेहून अधिक वर्षे जुना आहे. मला माहिती असल्याप्रमाणे या यात्रेनिमित्त गेल्या २०० हुन अधिक वर्षांपासून, यात्रेनिमित्त कुस्त्यांचे खेळ भारतात आणि बेलापूर केसरी हा किताब पुरस्कार विजयी मल्ल्याला दिला जातो. परंतु, या कुस्ती खेळासाठी कायमस्वरूपी आखाडा मैदान तयार करण्यात आले नाही. ही बाब मला कुठे तरी खटकत होती.

    पहिल्यांदाच नगरसेवक झाली असल्याने प्रशासनाचा लालफितीतला कारभार समजून घेण्यास थोडा उशीर लागला. परंतु, माझ्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात बेलापूर गावात जेथे कुस्तीचा आखाडा, दरवर्षी वर्षानुवर्षे भरतात त्याच सिडकोच्या पडीक गोडाऊनच्या जागेवर कायमस्वरूपी असे आधुनिक स्वरूपाचे सुसज्ज कुस्तीचे मैदान – आखाडा आणि सोबतच उर्वरित जागेत, बॅडमिंटन कोर्ट, हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, खो-खो मैदान आणि स्विमिंगपूल इत्यादी महापालिकेने विकसित करावे अशी मागणी केली होती. तसेच, सदर जागा सिडकोच्या मालकीची असल्याने, ती महानगरपालिकेने अनेक वर्षांपूर्वी हस्तांतरित करून घेतली आहे. याठिकाणी मी मागणी केल्याप्रमाणे आधुनिक स्वरूपाचे कुस्तीचा आखाडा व स्पोर्ट्स सेंटर उभारण्याची प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. ही आम्हा बेलापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी तसेच कॉलनीतील रहिवाश्यांसाठी आनंदाची बातमी असल्याचे पूनम पाटील यांनी सांगितले.