
पूर्व भागातील नागरिकांना वरदान ठरणारे भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण(येसाजी कंक जलाशय) गुरुवार (दि.२१) शंभर टक्के भरले असून धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजातून १६१४ क्युसेकने निरा नदी पात्रात निसर्ग सुरू आहे.
भोर : पूर्व भागातील नागरिकांना वरदान ठरणारे भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण(येसाजी कंक जलाशय) गुरुवार (दि.२१) शंभर टक्के भरले असून धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजातून १६१४ क्युसेकने निरा नदी पात्रात निसर्ग सुरू आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाची काहीशी वाढ झाल्याने विद्युत निर्मिती केंद्रद्वारे नदीपात्रामध्ये १६१४ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी-अधिक बदल होऊ शकतो ,असे संबंधित अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.मागील वर्षी भाटघर धरण १२ ऑगस्टला पूर्णक्षमतेने भरले होते.यंदा पावसाने ऑगस्ट महिन्यात पूर्णत: उघडीप दिल्याने तब्बल चाळीस दिवस उशिरा २१ सप्टेंबरला धरण १०० टक्के भरले आहे.तर यंदाच्या पावसात वीर धरण ९० टक्के भरले होते.मात्र डाव्या व उजव्या कालव्यातून पूर्वेकडे धरणातील पाणी सोडल्याने सध्या वीर धरणात ४४ टक्के पाणीसाठा उरला आहे. भाटघर धरण उशिरा का होईना पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर्वेकडील नागरिक तसेच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.