Finally Shweta became the dowry The marriage took place just three months ago a case was registered against nine people

सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर श्वेताचा पती प्रेमानंद याने घरच्या व नातेवाईकांच्या सांगण्यावरून श्वेताला माहेरवरून एक लाख रुपये हुंडा आण असा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून श्वेता हिने येवता गावातील शिवाजी हायस्कूल च्या पाठिमागे पाण्याने तुडुंब भरलेल्या कट्ट्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली.

    शिरपूर जैन : शिरपूर जैन पोलीस स्टेशन (Shirpur Jain Police Station) अंतर्गत येणाऱ्या येवता( yevata ) येथील अवघ्या तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या श्वेता नवघरे या नवविवाहितेचे लग्न झाले होते. माहेरून एक लाख रुपये हुंडा आण, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ (Physical and mental torture) करीत असलेल्या सासरच्या जाचाला कंटाळून तिने पाण्याने भरलेल्या कट्ट्यामध्ये उडी मारून आत्महत्या (suicide) केली. ही खळबळजनक घटना ७ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

    या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून ८ ऑगस्ट रोजी मृतक महिलेचा नवरा प्रेमानंद नवघरे व सासरा धर्माजी नवघरे या दोघांना अटक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच सपोनि महादेव भारसाकळे, नापोकॉ संतोष पाईकराव, पोकॉ जगदिश महले, महिला पोकॉ उषा पांडे यांनी तातडीने घटनास्थ गाठून पंचनामा केला. शिरपूर पोलीस सुत्राकडून प्राप्त माहितीनुसार येवता येथील रहिवाशी श्वेताचे लग्न अवघ्या तीन महिन्यापूर्वी १० मे रोजी गावातील प्रेमानंद धर्माजी नवघरे (Premanand Dharmaji Navghare) या तरुणाशी झाले होते.

    सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर श्वेताचा पती प्रेमानंद याने घरच्या व नातेवाईकांच्या सांगण्यावरून श्वेताला माहेरवरून एक लाख रुपये हुंडा आण असा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून श्वेता हिने येवता गावातील शिवाजी हायस्कूल च्या पाठिमागे पाण्याने तुडुंब भरलेल्या कट्ट्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. मृतक श्वेताचे वडील सुखदेव लक्ष्मण अवचार (रा. येवता ता. रिसोड) यांनी ७ ऑगस्ट रोजी शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.

    या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रेमानंद नवघरे, धर्माजी नवघरे, लक्ष्मी नवघरे, राहूल नवघरे, सुषमा नवघरे, अनिता नवघरे, जीवन नवघरे, सर्व (रा. येवता) तसेच माया राजू ऊर्फ सिद्धार्थ भिसे नणंद व राजू सिद्धार्थ भिसे नंदई दोघेही (रा. अंचळ) या नऊ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींपैकी नवरा प्रेमानंद धर्माजी नवघरे व सासरा धर्माजी नवघरे या दोघांना ८ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि महादेव भारसाकळे हे करीत आहेत.