Oath Ceremony | Live : अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गट- भाजपच्या १८ मंत्र्यांनी घेतली शपथ | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट2 महीने पहले

Live : अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गट- भाजपच्या १८ मंत्र्यांनी घेतली शपथ

ऑटो अपडेट
द्वारा- Ganesh Mate
12:14 PMAug 09, 2022

विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित

शपथविधी सोहळ्याला केवळ विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार उपस्थित होते.

12:07 PMAug 09, 2022

मंगलप्रभात लोढा यांनी घेतली शपथ

मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. १९९५ पासून सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. बिल्डर म्हणूनही त्यांची ओळख आहे.

12:05 PMAug 09, 2022

अतुल सावे यांनी घेतली शपथ

अतुल सावे यांनी घेतली शपथ

12:04 PMAug 09, 2022

अब्दुल सत्तार यांनी घेतली शपथ

अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असून या पार्श्वभूमीवर त्यांचा पत्ता कट केला जाईल असे बोलले जात होते. अब्दुल सत्तार २००९ पासून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.

12:03 PMAug 09, 2022

दीपक केसरकर यांनी घेतली शपथ

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सध्या त्यांच्यावर शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे.

11:59 AMAug 09, 2022

शंभूराज देसाई यांनी घेतली शपथ

सातार्‍यातील पाटणमध्ये १९९७ मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू तथा विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश हा सर्वार्थाने आगळा होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शंभूराजेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी शंभूराज देसाईंना दिले होते.

11:48 AMAug 09, 2022

रवींद्र चव्हाण यांनी घेतली शपथ

रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच, शिंदे गटाच्या निर्मीतीमध्ये सहभाग होता. ते डोंबिवलीमधून निवडून आले आहेत.

11:45 AMAug 09, 2022

तानाजी सावंत यांनी घेतली शपथ

तानाजी सावंत यांचे उस्मानाबादच्या राजकारणात नाव आहे. तसेच शिवसेनेत चांगले काम केले आहे.

11:42 AMAug 09, 2022

उदय सामंत यांनी घेतली शपथ

उदय सामंत यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. ते शिवसेनेचे मंत्री राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मंत्री राहिले आहेत. ते रत्नागिरीमधून निवडून आले आहेत.

11:39 AMAug 09, 2022

संदीपान भूमरे यांनी घेतली शपथ

संदीपान भूमरे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. ते शिवसेनेचे मंत्री राहिले असून औरंगाबादमधून निवडून आले आहेत. त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी असून पैठणमधून निवडून आले आहेत.

Load More

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा (Government Of Maharashtra) आज सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार (Shinde Group MLA) त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण १८ मंत्री आज शपथ (Oath Ceremony) घेणार आहेत.

शिंदे गटाचे ९ नऊ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनातील दरबार हॉल कार्यक्रम होणार असून मंत्रिमंडळ विस्तार होताच पावसाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे.

शिंदे गटातील ९ मंत्री : दादा भूसे, संदीपान भूमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड

भाजपचे ९ मंत्री : सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गवित, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण

Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.