
शहरात वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलिसांना काही अंशी यश येत आहे. मात्र, एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे चोरट्यांनी दुचाकीवरून येत चैन स्नॅचिंग करण्याचा फंडा सोडत थेट चारचाकी वाहनाचा उपयोग सुरु केला आहे.
पंचवटी : शहरात वाढलेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलिसांना काही अंशी यश येत आहे. मात्र, एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे चोरट्यांनी दुचाकीवरून येत चैन स्नॅचिंग करण्याचा फंडा सोडत थेट चारचाकी वाहनाचा उपयोग सुरु केला आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाची ७५ हजारांची सोन्याची चैन लंपास केली.
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. आता या चोरट्यांना पोलीस कसे पकडणार याकडे नाशिककरांच्या नजरा लागल्या आहे. फिर्यादी निवृत्ती लक्ष्मण नारखेडे (७६, रा. सनई बंगला, दत्तात्रयनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक) हे शुक्रवारी (दि.१०) सकाळी सहाच्या सुमारास अमृतधामकडून विडी कामगारनगरच्या दिशेने जात असताना अचानक एक चारचाकी वाहन त्यांच्याजवळ येऊन थांबले.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडीजवळ बोलावून घेत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत हातचलाखीने ७५ हजार रुपयांची सोन्याची चैन काढून देण्यास भाग पाडले. सोन्याची चैन हातात येताच गाडीतील तिघा भामट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.