गुटख्याच्या पुडीवरून आरोपीचा शोध, मध्यवर्ती गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

रमजान शेख यांनी शारीरिक सुखासाठी हत्या केल्याचे व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाय बांधून पाण्यात टाकल्याचे कबूल केले.

    नवी मुंबई : तळोजा पोलीस ठाणे हद्दीत एका १२ वर्षीय मुकबधीर मुलाचा पाय बांधून पाण्यात फेकलेला मृतदेह आढळून आला होता. त्या अनुषंगाने घटनास्थळावरील पुरावे व मयत मुलगा राहत असलेल्या परिसरातून ८ संशयित आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ चौकशी केली. घटनास्थळावरील मिळालेली गुटख्याची पुडी व ताब्यातील संशयित रमजान मोहब्बत शेख हा खात असलेली गुटख्याची पुडी ही सारखीच असल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात आली. रमजान शेख यांनी शारीरिक सुखासाठी हत्या केल्याचे व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाय बांधून पाण्यात टाकल्याचे कबूल केले.

    घटनास्थळी गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त अजय कुमार लांडगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी पथकासह भेट दिली होती. घटनास्थळावरील बारीक पाहणी केल्यावर त्या ठिकाणी त्यांना गुटख्याची पुढील माहिती मिळाली होती. तोच धागा पकडून मयत मुलगा राहत असलेल्या परिसरातील संशयीत इसम व परिसरातील लोकांकडे चौकशीसाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. यात ८ संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यातील रमजान मोहम्मद शेख हा तशाच प्रकारचा गुटखा खात होता. ज्याचा कागद घटनास्थळी मिळून आला होता. त्यात जोरावर रमजान यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता रमजान शेख यांनी शारीरिक सुखासाठी हत्या केल्याचे उघड झाले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्यात पाय बांधून टाकल्याचे कबूल केले. रमजान मोहम्मद शेख व २१ वर्षे राहणार दहिसर तळोजा याच्यावर डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्याला पुढील तपासासाठी डायघर पोलिसांच्या ताब्यात ही केस देण्यात आली आहे.