nagpur sheikh husain

शेख हुसेन (Fir Against Sheikh Hussain) यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला आहे. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे सगळीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची आंदोलने सुरु आहेत. नागपूरमध्येही आंदोलन झाले. या आंदोलनाच्या वेळी नागपूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींविषयी वादग्रस्त विधान केले.

    नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी (Derogatory Language) एका काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरात (nagpur) काँग्रेसचे नेते शेख हुसेन (Congress leader Sheikh Hussain) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेख हुसेन (Fir Against Sheikh Husaain) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर कलम २९४, ५०४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शेख हुसेन यांच्याविरोधात भाजपने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला आहे. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे सगळीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची आंदोलने सुरु आहेत. नागपूरमध्येही आंदोलन झाले. या आंदोलनाच्या वेळी नागपूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींविषयी वादग्रस्त विधान केले. त्याविरोधात भाजपाने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर नागपुरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री हुसेन विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्ये आणि गाणी) आणि ५०४ आयपीसी (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच हुसेन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. हुसेन यांना २४ तासांमध्ये अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ही भाजपकडून देण्यात आला आहे.