aaditya thackeray

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर मुंबईतील एनएम जोशी पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे.

    मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर मुंबईतील एनएम जोशी पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

    बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घाटन केल्याप्रकरणात आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्धघाटन केले.

    ”माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर मुंबईकरांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी काही गुन्हे दाखल केले आहेत. हा गुन्हा दाखल झाल्याचा अभिमान माझ्या आजोबांनाही वाटला असता”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

    डिलाइल रोडची १२० मीटरची एक लेन तयार असून १० ते १५ दिवसांपासून ती बंद ठेवली होती. कारण इथल्या घटनाबाह्य खोके सरकारला उ‌द्घाटन करण्यासाठी वेळ नव्हता. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.