महिलेचा विनयभंग करून ‘ते’ रेकॉर्डिंग व्हायरल केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

माणगाव तालुक्यातील विळे विभागातील साजे आदिवासी वाडी येथील महिलेचा विनयभंग करून रेकॉर्डिंग व्हायरल केल्याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे विभागातील साजे आदिवासी वाडी येथील महिलेचा विनयभंग करून रेकॉर्डिंग व्हायरल केल्याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व साक्षीदार यांचे प्रेमसंबंध असून, आरोपी रोहित वाघमारे हे एकाच गावातील राहणारे आहेत. रोहित हा फिर्यादी यांच्यावरील एकतर्फी प्रेमातून सतत पाठलाग करून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्यासोबत फिरायला चल, नाहीतर मी तुला मारेल’ अशी धमकी देत होता.

    १३ फेब्रुवारी रोजी १२.३० च्या सुमारास फिर्यादी यांच्या शेजारी बंद असलेल्या कुडाच्या घरात फिर्यादी व साक्षीदार एकत्र असताना आरोपी दत्ता पवार, गोपाळ पवार, मनोहर मोरे यांनी संगनमत करून तेथे येऊन साक्षीदार यांना हाताबुक्याने मारहाण करू लागले. तेव्हा फिर्यादी या सोडविण्यासाठी मधे आल्या असता आरोपी यांनी फिर्यादी यांच्या अंगावरील गाऊन काढून मनास लज्जा उत्पन्न करून अपशब्द वापरून अश्लील शिवीगाळ करून मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केली. ती रेकॉर्डींग फिर्यादी यांच्या संमतीशिवाय व्हायरल केली.

    या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.