रेशन दुकानाच्या कमिशनवरुन मोठा वाद; एकास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

रेशन दुकानाच्या कमिशनचे पैसे वडिलांच्या नावाने जमा झाले असूनही, आम्हाला का देत नाही म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    कुर्डुवाडी : रेशन दुकानाच्या कमिशनचे पैसे वडिलांच्या नावाने जमा झाले असूनही, आम्हाला का देत नाही म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण रावसाहेब काळे (रा.कव्हे ता.माढा) यांच्या वडिलांच्या नावे कव्हे (ता.माढा) येथे रेशन दुकान असून, ते दुकान किरणचे वडील रावसाहेब काळे यांचे असून, ते त्याने चुलते देवराव काळे चालविण्यास दिले होते. काळे हे गावात राहण्यास नाहीत, एक महिन्यापूर्वी किरणने त्याच्या वडीलांच्या नावे असलेले दुकान चुलते देवराव काळे यांच्याकडून परत मिळावे, यासाठी तहसीलदार माढा यांच्याकडे अर्ज केला होता. त्याप्रमाणे किरणला दुकान परत मिळाले.

    दुकान परत घेतल्याचा राग मनात

    देवराव काळे व त्यांची मुले किरणच्या मागावर होते. दुकान परत घेतल्याचा राग मनात धरून देवराव काळे, विकास काळे, अविनाश काळे ,चंद्रवती काळे (सर्व रा.कव्हे ता.माढा) यांनी किरण व त्याची आई केशर काळे यांना लाथाबुक्क्याने मारहाण व शिवीगाळ केली. तर विकास काळे याने किरणला दगडाने मारुन जखमी करत, तुम्हाला येथे राहू देणार नाही, असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.