मोठी बातमी ! भाजपच्या माजी नगरसेवकावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर (Vishnu Harihar) यांच्यासह दोन सराईत गुन्हेगारांवर खुनाच्या प्रयत्नासह जागा बळकावणे आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

    पुणे : भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर (Vishnu Harihar) यांच्यासह दोन सराईत गुन्हेगारांवर खुनाच्या प्रयत्नासह जागा बळकावणे आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

    याप्रकरणी माजी नगरसेवक विष्णू हरिहर, गुन्हेगार राहुल खुडे, प्रेम क्षीरसागर यांच्यासह साथीदारांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सादिक बोजा यांनी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी जागा बळकावण्यासाठी माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्या सांगण्यावरून आरोपींनी त्यांना धमकावले आहे. तर त्यांच्यावर पिस्तूल रोखून ठार मारण्याचा प्रयत्न केला असून, त्यांचा मित्र यांनाही या आरोपींनी लाठ्याकाठ्या घेऊन जाऊन त्यांच्या वाहनांची तोडफोड केली व धमकावले आहे.