कपाशीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

खेडले परमानंद (ता.नेवासा) शिवारात एका अज्ञात इसमाने दुसऱ्याच्या चार एकर शेतात कपाशीवर टू - फोर डी या तणनाशकाची फवारणी करुन चार एकर कपाशी नुकसान केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेवासा : खेडले परमानंद (ता.नेवासा) शिवारात एका अज्ञात इसमाने दुसऱ्याच्या चार एकर शेतात कपाशीवर टू – फोर डी या तणनाशकाची फवारणी करुन चार एकर कपाशी नुकसान केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, खेडले पारमानंद शिवारात इम्रान रमजान इनामदार यांच्या गट (क्रमांक २५५) या चार एकर क्षेत्रात कपाशी लावलेली होती. मात्र, त्यावर अज्ञात व्यक्तीने, 24 डी,या तणनाशकाची फवारणी करुन उगलेल्या कपाशीचे नुकसान केल्यामुळे इनामदार यांनी त्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन घटनास्थळी सहाय्यक कृषी अधिकारी कामगार तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी समक्ष पाहणी केली.

    यावेळी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.