प्रतिकात्म्क फोटो
प्रतिकात्म्क फोटो

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे. या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली माहिती समोर आलेली नाही.

    कोल्हापुर – गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये आग लागली आहे. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये भीषण आग लागली असून आगिवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे. या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली माहिती समोर आलेली नाही.

    दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी पहिल्यांदाच बाहेर पडल्याचे समजते. मात्र, याबाबत अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जीवितहानी टाळण्यासाठी ॲम्बुलन्स आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्याने इतर कंपन्यांकडे आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.