सोहाळे येथे भीषण आग; नर्सरीसह खाजगी क्षेत्राचे मोठे नुकसान

सोहाळे ते सुलगाव (ता.आजरा) दरम्यान असलेल्या वनविभागाच्या नर्सरीसह खाजगी क्षेत्राला लागलेल्या आगीत जंगलसंपदा, जैवविविधतेसह काजूची झाडे व गवताचे मोठे नुकसान झाले. जवळपास चार ते पाच एकर परीसर जळून खाक झाला. 

    उत्तुर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोहाळे ते सुलगाव (ता.आजरा) दरम्यान असलेल्या वनविभागाच्या नर्सरीसह खाजगी क्षेत्राला लागलेल्या आगीत जंगलसंपदा, जैवविविधतेसह काजूची झाडे व गवताचे मोठे नुकसान झाले. जवळपास चार ते पाच एकर परीसर जळून खाक झाला.
    सोहाळे येथील शेतकरी मारुती कळेकर, धोंडीबा कळेकर, दत्तात्रय कळेकर, उज्वला कळेकर, सुरेश देसाई (सुलगाव) यांनी शेताकडे धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वणवा आटोक्यात आला नाही. तत्पूर्वी मारुती कळेकर व धोंडीबा कळेकर यांच्या रांगी नावाच्या शेतातील पन्नास काजूची झाडे जळाली व गवताचेही मोठे नुकसान झाले.
    वनविभागाच्या नर्सरीतील वनसंपदेबरोबरच काजूच्या झाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत वणवा सुरुच होता. वनकर्मचाऱ्यांचेही उशिरापर्यंत वणवा विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. आगीमुळे मारुती कळेकर व धोंडीबा कळेकर यांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचा परिणाम काजू उत्पादनावर होणार आहे. दरवर्षी आगीचा मोठा फटका कळेकर यांना सहन करावा लागत असल्याने वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.