पुण्यात मंडप साहित्याच्या गोडाउनला भीषण आग; तीन जणांचा मृत्यू, एका पाठोपाठ चार सिलेंडरचा स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वाघोलीत उबाळे नगर येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता आग लागली आहे.

    पुणे :  लग्नसराईचे दिवस असताना पुण्यातील वाघोली येथील मंडप आणि सजावटीच साहित्य असलेल्या एका गोडाऊनला ( Fire In Pune ) भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर एका पाठोपाठ एक गोडाऊनमध्ये ठेवेलेले  ४ सिलेंडर फुटले आहेत. ही आग कशामुळे लागली, हे कारण समजू शकले नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पुणे शहरातील वाघोलीत उबाळे नगर येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता आग लागली आहे. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या दुकानाच्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत ४ सिलेंडर फुटल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला देताच त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली.  अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.