
अग्निशमन दलाच्या सुमारे ३ गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दादर पूर्वेतील नायगाव परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सर्व फर्निचर जळून खाक झाले आहे. दुकान बंद असल्याने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…