संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला

    छत्रपती संभाजीनगर : आज सगळीकडे सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नववर्षाचं स्वागत करण्याची प्रत्येकाची लगबग सुरू आहे. मात्र, या लगबगीत छत्रपती संभाजीनगरमधुन (Chhatrapati Sambhaji Nagar)  अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हँडग्लोज (Hand Gloves) बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, चार कामगारांना स्वतःचा जीव वाचवण्यात यश आलं.

    नेमकं काय घडलं

    मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीमध्ये ही आग लागली. शनिवारी रात्रीच्या सुमारास (30 डिसेंबर) नेहमीप्रमाणे काम संपवुन काही कामगार कंपनीतील परिसरात झोपले असताना अचानक आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 जणांनी बाहेर पडत  स्वतःचा जीव वाचवला.  भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.