कांदिवली पश्चिम येथील इमारतीला भीषण आग; चौघे जण भाजले, अग्निशमनच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील कांदिवली पश्चिम (Kandivali West Building) येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली. ही आग कांदिवली पश्चिमेकडील पवन धाम वीणा संतूर (Pavan Dham Veena Santur) इमारतीला लागली.

    मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम (Kandivali West Building) येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली. ही आग कांदिवली पश्चिमेकडील पवन धाम वीणा संतूर (Pavan Dham Veena Santur) इमारतीला लागली. या आगीत चार जण भाजले असून, त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

    कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये मोठी आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. या आगीत चार जण भाजले असून, त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पवन धाम वीणा संतूर इमारतीमध्ये आग लागली. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.