
छत्रपती संभाजीनगर शहरातील ह्युंदाईच्या शोरूमला भीषण आग लागली आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील क्रांती चौक परिसरात असलेल्या ह्युंदाईच्या शोरूमला भीषण आग (Hrundai Showroom Fire) लागली आहे. या आगीत शोरूममधील स्पेअर पार्ट्स गोडाऊन जळून पुर्णपणे खाक झालं आहे. (Chhatrapati Sambhajinagar News) याआगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाने दोन बंब आणि पाण्याच्या दोन टँकरच्या मदतीने आग विझवली आहे. मात्र या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.