jalna fire

जालना शहरातील भवानी नगरमध्ये जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. 

    जालना: जालना (Jalna News) शहरात जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग (Jalna Fire News) लागली आहे.  जालना शहरातील भवानी नगरमध्ये ही घटना घडली आहे. या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने भीषण रूप धारण केलं. आग भडकल्यानंतर गोडाऊनच्या आजूबाजूला असलेल्या काही टपऱ्यादेखील आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या. सध्या ही आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून आग शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (Fire News)