मुंब्रा येथील एम.जे कंपाऊंडमध्ये अग्नितांडव, आगीत 4 ते 5 गोदामं जळून खाक, जिवितहानी नाही

मुंब्र्यातील आगीत कोणतीही जीवितहानी व कोणलाही दुखापत नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहीती समोर आली आहे. सदर घटनेत एम. जे. कंपाऊंड मालक मोहम्मद जावेद हकीमुल्ला चौधरी यांच्या मालकीच्या जागेमध्ये असलेल्या एकुण-१७ पत्र्याच्या गाळ्यांमध्ये आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ठाणे अग्निशमन दलाचे 7 तर नवी मुंबई अग्निशमन दलाचे 2 गाड्या आग विझवण्यासाठी वापरण्यात आल्या.

    ठाणे : शिळफाटा भागातील आचार गल्लीमध्ये, एम.जे कंपाऊंडमध्ये पहाडे 4.30 वाजण्याच्या सुमारास गोदामांना आग लागली. हि आग एवढी भीषण होती की, या आगीत चार ते पाच गोदामं जळून खाक झाली आहेत. या ठिकाणी मे. एम. जे. कंपाऊंड येथील एकूण १७ प्लॅस्टिक भंगार वस्तू असलेल्या पत्र्याच्या गाळ्यांना आग लागली होती. सदर घटनास्थळी शीळ डायघर पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १ जे.सी.बी. मशीनसह व अग्निशमन दलाचे जवान २ फायर वाहन, २ रेस्क्यू वाहन, २ वॉटर टँकर, १ जम्बो वॉटर टँकर, तसेच नवी मुंबईचे कोपरखैराने अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहन व १-जम्बो वॉटर टँकर वाहनासह दाखल झाले.

    दरम्यान, सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मार्फत सुमारे ५ तासाच्या प्रयत्नानंतर सदर आगीवर नियंत्रण मिळविले असून, घटनास्थळी अजूनही कूलिंगचे काम सुरू आहे. सदर घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी व कोणलाही दुखापत नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहीती समोर आली आहे. सदर घटनेत एम. जे. कंपाऊंड मालक मोहम्मद जावेद हकीमुल्ला चौधरी यांच्या मालकीच्या जागेमध्ये असलेल्या एकुण-१७ पत्र्याच्या गाळ्यांमध्ये आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. ठाणे अग्निशमन दलाचे 7 तर नवी मुंबई अग्निशमन दलाचे 2 गाड्या आग विझवण्यासाठी वापरण्यात आल्या.