वडगावात लागलेल्या आगीत कंपनी व शेकडो फळझाडे जळून खाक

अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत कंपनी व शेकडो फळझाडे जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (दि.३०) दुपारी पाऊणे एकच्या सुमारास वडगाव नगरपंचायत हद्दीतील रघुनाथ उर्फ पंडित जाधव यांच्या सर्व्हे नंबर १३६ अ , ७,८,९ व १० मध्ये घडली.

    वडगाव मावळ : अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत कंपनी व शेकडो फळझाडे जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी (दि.३०) दुपारी पाऊणे एकच्या सुमारास वडगाव नगरपंचायत हद्दीतील रघुनाथ उर्फ पंडित जाधव यांच्या सर्व्हे नंबर १३६ अ , ७,८,९ व १० मध्ये घडली.

    तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आला. पण त्यांच्याकडे पाईप नसल्याने कंपनीची आग न विझवता परत गेल्याचे प्रत्यक्षदर्शी रघुनाथ उर्फ पंडित जाधव यांनी सांगितले.

    तळेगाव एमआयडीसीचा अग्निशमन बंब आला. पण काही वेळातच त्यांच्या हद्दीत आग लागल्याचे सांगून निघून गेला. या आगीत सिमेंटचे ब्लॉक बनविण्याची कंपनी जळून खाक झाली. यात सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले तर आंबा, पेरू व साग असे शेकडो झाडे जळून खाक झाले.

    या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. वाढत्या आगीच्या घटनेमुळे परिसरात चिंता निर्माण झाली आहे.

    मावळ तालुक्याचे मुख्यलाय असलेल्या वडगाव नगरपंचायतीकडे अग्निशमन बंब नसल्याने तळेगाव दाभाडे व तळेगाव एमआयडीसी यांच्या अग्निशमन बंबावर अवलंबून राहावे लागत आहे.

    वडगावात दोन दिवसापूर्वीच केशवनगर येथे फ्लॅटमध्ये आग लागली. पण बंब उशीरा आल्याने फ्लॅट जळून खाक झाला. वनक्षेत्राच्या हद्दीत वारंवार वनवे लागतात. ते वनवे विझविण्यासाठी अग्निशमन बंब वेळेत पोहचत नाही. वन मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे नुकसान होते.