गिरगावात भीषण अग्नितांडव!

    बुधवारी दिवाळी पाडव्याच्या दिवशी मुंबईतील गिरगाव येथे रात्री ११:३० च्या सुमारास भीषण आग लागली. गिरगावातील मुगभाट उरणकर वाडीच्या नाक्यावरचे बंद गोडाऊ, पार्क केलेल्या चार चारचाकी गाड्या, सात आठ दुचाकी गाड्या आणि शेजारच्या इमारतीतील काही घरे या आगीत जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आहे.
    गिरगाव येथे लागलेल्या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी आगीच्या ठिकाणी असलेल्या गाड्या बाजूला करताना एक स्थानिक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अग्निशामक दलाकडे फ्लडलाईट नव्हते, तेव्हा स्थानिकांनी काही वेळाने फ्लड लाईट्स ची व्यवस्था केली असता अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.