पुणे : रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील मुलींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
रास्ता पेठ परिसरात ताराचंद रुग्णालयाच्या मुलींचे पार्किंग व तीन मजली इमारतीचे वसतिगृह आहे.
रास्ता पेठ परिसरात ताराचंद रुग्णालयाच्या मुलींचे पार्किंग व तीन मजली इमारतीचे वसतिगृह आहे.
खोली क्रमांक चारमध्ये अचानक आग
याठिकाणी मुली राहण्यास आहेत. दरम्यान, आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये अचानक आग लागल्याचे दिसून आले. या खोलीतील ३ मुली लागलीच धावतपळत खाली आल्या. तसेच, इतर मुलींनाही याची माहिती दिली. आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. सर्व मुली व सुरक्षारक्षक इमारतीमधून बाहेर पडले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.
घटनास्थळी कसबा अग्निशमन केंद्राच्या फायर बंब व जवान दाखल
मुख्यालय व कसबा अग्निशमन केंद्राच्या फायर बंब व जवान दाखल झाले. त्यानंतर जवानांनी पाण्याचा माराकरून आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु, खोलीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, ही आग खोलीत असणाऱ्या हिटरमुळे लागल्याचे सांगण्यात आले आहे. आग लागल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी १८ अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक सचिन चव्हाण, समीर शेख व तांडेल सुनिल नामे, संजय गायकवाड आणि जवान भुषण सोनावणे, सतीश ढमाळे, अक्षय शिंदे, परेश जाधव, केतन नरके, आतिश नाईकनवरे, शुभम देशमुख यांनी सहभाग घेतला.
ससून रुग्णालयातील लिफ्टमध्ये ६ जण अडकले
ससून रुग्णालयात (नवीन इमारत) चौथ्या व पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये सहा व्यक्ती अडकल्याची घटना घडली. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत लिफ्टमध्ये अडकलेल्या एका महिलेसह सहा जणांची सुखरूप सुटका केली. जवळपास एक तासापासून हे सर्वजन लिफ्टमध्ये अडकून पडले होते.