नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत अग्नितांडव; मिरची जळून खाक

कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री दोन वाजता सुमारास लागली. घटनेची माहती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही शहरापासून दूर आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच भडकली. आग भीषण असल्याने काही वेळातच कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली.

    नागपूर – कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kalamna APMC) परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीमध्ये एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची (Red chili) जळून खाक झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान (Traders Big Loss) झाले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण (Control On Fire) मिळवण्यात यश आले आहे.

    कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री दोन वाजता सुमारास लागली. घटनेची माहती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही शहरापासून दूर आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच भडकली. आग भीषण असल्याने काही वेळातच कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली. सध्या अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

    नागपूरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांची मिरची जळून खाक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजार समितीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आग लागलेल्या शेडमध्ये कालच इलेक्ट्रिसिटीचे काम झाले होते. ते काम अर्धवट असल्यामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आगीत जळून खाक झालेली मिरची शेतकऱ्यांची होती. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संचालक मंडळातील सदस्यांनी केली आहे.