parakh hospital

घाटकोपरमध्ये पारख रुग्णालय असलेल्या इमारतीला आग लागली आहे.

    मुंबई : घाटकोपर (Ghatkopar Fire) (पूर्व) मधील पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग लागली आहे. या रुग्णालयात अनेकजण अडकल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालय असलेल्या इमारतीतील हॉटेलला आग लागली आहे. रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

    अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

    आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच रुग्णांना तातडीने राजावाडी रुग्णालयात हलवण्यात येत आहे.