navi mumbai pavne midc

पावणे एमआयडीसीतील (MIDC) एका रासायनिक कंपनीला भीषण आग (Fire In Navi Mumbai) लागली. आगीविषयीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

    नवी मुंबई : नवी मुंबईच्या (Navi Mumbai) पावणे एमआयडीसीतील (MIDC)एका रासायनिक कंपनीला दुपारी ३ वाजता भीषण आग लागली होती. आगीविषयीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग इतकी भयानक होती की शेजारच्या सहा कंपन्या (Company) जळून खाक झाल्या आहेत. तिथले दोन कर्मचारी आग लागल्यानंतर बेपत्ता होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.

    काल दुपारी एमआयडीसीत आग लागल्यानंतर अनेकांची भंबेरी उडाली होती. उन्हाच्या तडाख्यात आग लागल्याने अनेकांनी भीती व्यक्त केली होती. एका कंपनीला आग लागली होती. एका कंपनीच्या आगीमुळे सहा कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. कालपासून तिथं सर्च ऑपरेशन राबवल जात आहे. दोन व्यक्ती गायब असल्याची माहिती पोलिसांना आणि अग्नीशमक दलाला दिली होती. आज त्यापैकी एका इसमाचा मृतदेह सापडला. गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर अद्याप अजून एकजण गायब असल्याने पोलीस आणि अग्नीशमक दलाचं पथक शोध घेत आहे. उन्हाच्या झळा इतक्या लागत होत्या की, अग्नीशमक पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते होते.

    दुपारी लागलेली आग मिळालेल्या माहितीनुसार आठ कंपन्यांमध्ये पसरली होती. आग लागलेल्या कंपन्यांमध्ये केमिकल ड्रग्ज होते. ड्रग्ज फुटत असल्याने आगीचा भडाका उडत होता. त्यावेळी आगीला नियंत्रणात आणणं शक्य नव्हतं. कारण उन्हामुळे ७० मीटरपर्यंत आगीच्या झळा लागत होत्या. अग्नीशमक दलाच्या जवानांनी कंपनीच्या बाहेरून आग विझवण्याचा अथक प्रयत्न केला. तसेच आग आटोक्यात आल्यानंतर तिथलं ड्रग्ज त्यांनी धाडसाने बाहेर काढले. अग्नीशमक दलाकडून मारण्यात येत असलेल्या पाण्याचा काहीच उपयोग होत नव्हता.