VIDEO! पुणे टिंबर मार्केटमध्ये आग; अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीचे कारण..

मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या वस्तीमध्ये असलेले 10 सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी जिवितहानी झाली असती.

    पुणे – पुण्यातून एक आगीची घटना समोर येत आहे. (Pune Fire) पुणे टिंबर मार्केटमध्ये लाकूड (Wood) सामान असलेल्या एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग एवढी भीषण आहे की, शेजारील चार घरांनाही आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाकडून (fire bridge) आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून, अग्निशमन दलाच्या तीस गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वात आधी आग आणखी पसरु नये यासाठी दक्षता घेतली. आधीच शेजारील चार घरं आगीच्या भक्ष्यस्थानी आली होती.

    अन्यथा मोठा अनर्थ घडला असता…

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या वस्तीमध्ये असलेले 10 सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी जिवितहानी झाली असती. आग मोठी असल्यानं मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर 20 अधिकारी आणि जवळपास 100 जवान आणि पुणे मनपा, पुणे कॅन्टोमेंट, पीएमआरडीए, पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशा एकूण जवळपास 30 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि खाजगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आगीत कोणीही होरपळून जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.