मराठा महासंघाच्या प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर गोळीबार

या घटनेमुळे खंडाळा, शिरवळसह पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारात सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. गोळीबार केलेनंतर आरोपी पळून गेले असून कोणत्या कारणाने हल्ला करण्यात आला याबाबत तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    पुणे – अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर मंगळवारी दुपारी भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील मोर्वे-वाघोशी खिंडीत दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार करण्यात आला आहे. बचावासाठी कोंडे-देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकाने देखील हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.

    या घटनेमुळे खंडाळा, शिरवळसह पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारात सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. गोळीबार केलेनंतर आरोपी पळून गेले असून कोणत्या कारणाने हल्ला करण्यात आला याबाबत तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    आखिल भारतीय मराठा महासंघ युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे – देशमुख (रा. धनकवडी, पुणे) हे वीर धरण लोणंद येथील शंकराचे मंदीर दर्शन घेऊन लोणंद येथे प्लाॅट पाहण्यासाठी चालले असताना निर्जन रस्त्यावर सदरचा प्रकार घडलेला असुन सदरचा प्रकार हा आर्थिक व व्यवसायिक कारणांवरून घडला असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.