शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या आलमला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोरच हवेत गोळीबार

मोमिनपुराच्या अल करीम गेस्ट हाऊसचे संचालक जमील अहमद यांच्या खून प्रकरणात शेजारच्या राज्यांतून शस्त्रांचा पुरवठा करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात इमरान आलम रा. परासिया याला अटक (Imran Parasia) केली होती.

    नागपूर : मोमिनपुराच्या अल करीम गेस्ट हाऊसचे संचालक जमील अहमद यांच्या खून प्रकरणात शेजारच्या राज्यांतून शस्त्रांचा पुरवठा करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात इमरान आलम रा. परासिया याला अटक (Imran Parasia) केली होती. चौकशीत रायपूरचा तौकीर अहमद त्याला शस्त्र उपलब्ध करत असल्याची माहिती मिळाली.

    त्याला पकडण्यासाठी रायपूरला गेलेल्या तहसील पोलिसांना पाहताच तौकीरने हवेत गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल घेराबंदी करून तौकीरला अटक केली. त्याच्याकडून 4 पिस्तूलही जप्त करण्यात आल्या. जमीलचे मारेकरी मोहम्मद परवेज सोहेल, आशीष बिसेन आणि सलमान समशेर अलीला अटक केल्यानंतर पोलिसांनी शस्त्रे पुरवणाऱ्यांचा शोध घेतला. त्यात तौकीरचे नाव पुढे आले.

    पोलिसांचे पथक बुधवारी रायपूरला गेले. पोलिस आल्याचे समजताच पसार होण्यासाठी तौकीरने गोळीबार केला. सावधगिरीने काम घेत तौकीरला पकडण्यात आले. तौकीरने सावत्र आई आणि वडिलांचा खून केला होता. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. जामीनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने शस्त्रांचा अवैध धंदा सुरू केला.